श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाविषयी

रत्नागिरी

श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाविषयी. . .

श्री लक्ष्मीपल्लीनाथ हे अनेक कहऱ्हाडे ब्राह्मणांचे कुलदैवत आहे. कहऱ्हाडे ब्राह्मण महाराष्ट्रातल्या कऱ्हाडमधून कोकणात आले, असे मानले जाते. तेथून येताना त्यांनी आपल्या लक्ष्मीरवळनाथ या उपास्य दैवताची प्रतिष्ठापना लक्ष्मीपल्लीनाथाच्या नावाने करंबेळे (सध्याचे पाली) येथे केली. मंदिर साकारले. वर्षानुवर्षे मंदिराची जोपासना आणि अभिवृद्धी केली. वार्षिक उत्सवही साजरा केला;
मात्र तेथे सेवा करण्यात अडचणी निर्माण झाल्यानंतर सुमारे आठशे वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. पुन्हा एकदा नव्या जागी मठ (ता. लांजा) येथे नवीन मंदिर साकारायचा निर्धार केला. जिद्दीने केलेला हा निर्धार आता पूर्णत्वाला गेला आहे.


  • हरि आला रे, हरि आला रे। संत संगे ब्रह्मानंदु झाला रे ।।
अधिक वाचा

ध्यायेत त्रैगुण्यरूपं त्रिगुणगुणमय ज्योतिरूपं स्वरूपम् । वामे पत्रं त्रिशूलं डमरुगसहितं खड्‌गहस्ते विराजम् ।।
शेषारूढं सशक्तिकं कमलपदयुगं भक्तकारुण्यगम्यम् । सवंगि लिंगरूपं उपवितिसहितं श्रीपल्लनाथरूपम् ।।

मंदिर आणि परिसर

श्रीलक्ष्मीपल्लीनाथाचा इतिहास

श्रीलक्ष्मीपल्लीनाथाचा इतिहास

मौ जे पाली, ता. रत्नागिरी येथे असलेले लक्ष्मीपल्लीनाथाचे देवस्थान हेच आठल्ये घराण्याचे कुलदैवत होय. पाली या गावाचे पूर्वीचे नाव करंबेळे असे असून त्यावेळच्या ग्रामदैवतांच्या मूर्ती अरण्यात एकत्र ठेविलेल्या होत्या. अलीकडेच त्यांचे तेथे एक लहानसे देवालय बांधून त्यात त्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यास 'करंबेळदेव' असे म्हणतात. पल्लीनाथाच्या स्थापनेमुळे या गावाचे नाव पाली व देवाचे नाव पल्लीनाथ असे रूढ झाले आहे.

अधिक वाचा

कुलोपासकांनी साकारले कुलस्वामीचे मंदिर

श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाची स्थापना झाल्यानंतर मंडळ अस्तित्वात आले. सुधाकर चांदोरकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. मंदिराच्या न्यासाची १७ऑक्टोबर २०१२ रोजी रीतसर नोंदणी झाली. मठ (ता. लांजा) येथे शशिभाऊ गुण्ये यांनी २ एकर जागा नाममात्र मोबदल्यात मंदिरासाठी उपलब्ध करून दिली. नवी जागा हाती आल्यानंतर तेथे २ जानेवारी २०१३ रोजी भूमिपूजन झाले. भूचक्र यज्ञ करण्यात आला. मंदिर उभारण्याच्या दृष्टीने एकत्रीकरण झाले, त्यात तरुणांचा सहभाग मोठा होता. सर्व कुलोपासकांनी देणग्या दिल्या. त्यानंतर दर महिन्याला ठरावीक देणगी देणारे अनेक कुलोपासक आहेत. त्यांच्या अर्थसाह्यातून नियोजित प्रकल्प २०१८ साली पूर्ण झाला आहे.

अधिक वाचा

श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे वर्षभर होणारे सण, उत्सव

चैत्रोत्सव

गुढीपाडवा आणि वार्षिक चैत्रोत्सव (दरवर्षी वर्धापनदिनी म्हणजेच उत्सवाच्या पहिल्या दिवशी चतुःषष्टी राजोपचार पूजा)

मासिक जागर

दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मासिक जागर (आरती, नामजप, भजन)

श्रावणोत्सव

श्रावणोत्सव (श्रावण महिन्यातील सर्व रविवारी).

दैनंदिन पूजाअभिषेक सेवा

वाढदिवसासारख्या भक्तांच्या आठवणीच्या दिवशी त्यांच्या इच्छेनुसार अभिषेक पूजा, कुंकुमार्चन, अलंकार सेवा, अन्य सेवा आणि धार्मिक विधी केले जातात.

छायाचित्रे